Monday, November 2, 2009

जुन्याच रक्ताची नवी पिढी

परवा एका जेष्ठ्य राजकारणी नेत्याशी बोललो। लोकशाहीची थट्टा ज्यामुळे होते आहे त्या घराणेशाहीवर। डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, वकिलाचा मुलगा वकील तर राजकारण्याचा मुलगा राजकारणी का नको? असा साक्षात्कार (?) त्यांनी मला करवून दिला. मी पण अगदी आतुर असल्याचा आव आणून त्यांना ऐकत होतो. अर्थात जमलेले सर्व बावळट अशा अविर्भावात ते बोलत होते. त्यांना म्हटले, ''असे असेल तर मग तळागाळातल्या (सतरंज्या उचलणाऱ्या) कार्यकर्त्यांचे काय? त्यांनी आधी तुमच्या आणि आता तुमच्या दिवटयांच्या चरणीच निष्ठा वाहायची? '' मग मात्र ते विधानसभेत बसतात तसे बसले (गप्प). ( ऑफ द रेकॉर्ड - काही वर्षांनी लोकशाही नावाची सर्कस, जनता जनावरे आणि रिंगमास्टर.............! येत्या पाच वर्षात कळेलच म्हणा हि राजकारणातली जुन्याच रक्ताची नवी पिढी काय प्रकाश पडते ते. ) लोकसभा व त्यानंतर लगेचच आलेल्या विधानसभा निवडणुकांमुळे घराणेशाहीचा मुद्दा फारच चघळला गेला. अर्थात 'राजकारण्यांच्या मुलांमध्ये कर्तुत्व नसते काय?' असे राष्ट्रवादीचे जेष्ठ्य नेत्याला वाटत असेल तर गैर काही नाही. पण साहेब फक्त एका प्रश्नाचे उत्तर मला सापडले नाही तुम्ही द्याल? चवथीच्या पुस्तकात शिवाजी महाराजांचा धडा होता. म्हणे शिवबांनी हिंदवी स्वराज्य, आणि रयतेच्या रक्षणासाठी मिर्झा राजे जयसिंग यांना राज्य देऊ करून स्वतः तुमची चाकरी करीन अशी विनवणी केली होती. त्यावेळी शिवाजी महाराज संभाजीराजांच्या कर्तृत्वासाठी भांडले नाहीत का?''
समाजाच्या हितासाठी अनेक नेत्यांनी वैयक्तिक जीवनात कठोर निर्णय घेतल्याचे स्मरते. भारत स्वतंत्र होत असताना नौखालीत जातीय दंगली शमवणारे गांधी भेटले, 'ऑपरेशन ब्लू स्टार' नंतर अनेकदा सूचना करूनही शीख अंगरक्षक न बदलणाऱ्या इंदिराजीही भावल्या. जे पी यांनी तर त्यांचा पिढीला वेड लावायचे बाकी ठेवले होते. आणि हो राहिलंच मंत्रीपदावरून सबंध राज्याला २०- २० वरून अनिश्चिततेच्या पीचवर उभे करणारे नेतेही यंदाच्या साठमारीत बघायला मिळाले. (तुम्ही ऐकताय ना 'राजे' ?)

Monday, October 5, 2009

'तत: किम'

'जाती पाती जुनाट भिंती,पाडूनी टाकू घडवू क्रांती', या गीताच्या ओळी आमच्या पत्रकार, कार्यकर्ता, सहकारी मित्राने ऐकवल्या. जुन्या आठवणीत ते रमले, मलाही रमवले! कधी प्रबोधीनिमुळे समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचात निर्माण झालेली उर्मी तर कधी नर्मदा बचाव आंदोलनात केलेले कार्य, सार्याचा पट त्यांनी मांडला. त्यांचे भारावून जायचे ते दिवस होते. माझा पिढीला असे भारावून जाता आलाच नाही. मोठी माणसे भेटलीत पण त्यांचे पाय मातीचे दिसलेत. तुलेनेने हे नशीबवान निघाले. ''दहा वर्षांच्या पत्रकारीतेनंतरहि माझातला कार्यकर्ता मला जिवंत ठेवायचा आहे,'' असे सांगताना त्यासाठी त्यांची चाललेली तळमळ मलाही स्पर्शून गेलीच. दहा वर्षांपूर्वी नर्मदा बचाव आंदोलनातला सहभाग, प्रबोधीनितले त्यांचे 'पूर्णवेळ' असतानाचे दिवस, अण्णा हजारेंचा गावात जाऊन केलेले काम, सारं तनामनावर संस्कार करणाऱ्या दिवसांचा कॅनव्हास ते चितारत होते आणि मी मात्र त्यातून माझे कोलाज शोधात होतो. आमचे वय सारखे नाही, अनुभव सारखा असणे तर दूरच. पण एक धागा मात्र समान. विचारसरणी म्हणता येणार नाही पण जुनी पद्य एकली कि भारावून जाणे कदाचित हेच सारखेपण. त्यातच त्यांनी 'तत: किम' (तरी सुद्धा) हे पद्य गुणगुणले. मला चाल माहित नाही. पण एक ओळ मात्र थेट भिडलीच.. ''क्षणाचीच आरास जाईल हि वाया, जरी जीवनी राष्ट्रसेवा घडेना!'' अर्थात माझा मनातील आंदोलने क्षणिक नाहीत हे मला ठावूक आहे. आताशा कुठे माझा समस्यांची जाणीव होते आहे; समाजाच्या समस्या कधी समजून घेणार? त्यात व्याप वाढत आहेत. पण माझे हे पत्रकार कम कार्यकर्ता मित्र मला नेहमी सांगतात,' तुझा वयाचा असताना मी हि असाच होतो.! ''

Friday, October 2, 2009

व्यथा

निवडणुकीच्या धामधुमीत सारी वर्तमानपत्रे व्यस्त, जनता मस्त, मत स्वस्त आणि उप-संपादक त्रस्त...

Tuesday, September 1, 2009

देव नसल्याची अजून एक 'अनुभूती'

आज पुन्हा मित्रांशी भांडलो. विषय तोच, देव! मी नेहमीप्रमाणे ठाम देव नाही म्हणून. पण मग अशी एक शक्ती असते जी सारे नियंत्रित करत असते, असा जुनाट, पुचाट झालेला विचार (देवाइतकाच) आमचा मैत्रिणीने मांडलाच. शेवटी ज्याची त्याची अनुभूती आहे, असे सांगून गप्प बसलो. मग एकदम दाभोलकर आठवले. देवासाठी आपण जे जे करतो तो कार्यकारण भाव आहे तो महत्वाचा. बाकी सारे थोतांड. मी मात्र अचंबित. आईने सांगितले होते म्हणून चतुर्थी करायचो, आता तर चातुर्थीलाही नॉन वेज चालते. एकदम बदल ? खरे तर मला हि अनपेक्षित होते पण आता काही वाटत नाही. कधी तरी थेऊरलाही गेलो होतो. पण दाटून आले नाही. तोच देव, तितकाच माणसाला निष्क्रिय बनविणारा. माणसे मात्र वेडी, आप्ताजानांकडे दुर्लक्ष करून देवाला पुजणारी. आधी श्रद्धा, भक्ती, देव म्हटले कि नकळत हात जोडले जायचे आता साधे तरंगही उठत नाही. कारणे अनेक आहेत, मला सापडली कि सांगेन.

Thursday, April 23, 2009

finding something..

hi. 2day i m in a night shift. really busy with my work. from last week my life change suddenly. snehal alway say," mens to be used and thinhgs to be loved''. now a days i m feel it. from last two years i m staying alone at here. apart from my house. but during this 2 years i never feel homesik.
but nw a days i feel alone. i lost something. now really i can say i have nothing to loose. my teacher told me, one is equal to zero and two is equal to infinity. when two peple come togather who work in a same dorection, same attitude with the effort then victory is certain. gender doesent matter here. it may be he or she. now i remain zero. i m searching for that '' two''. will i get it?

Friday, March 27, 2009

life is like this my dear...

what is life? everyone asks this question once in the life. i m also sarching for the ans. i dont get what is it exactly, but certain things i came to know. life means only loss and gain. really , dont u belive? but this is true. rememember ur past. the most things loved most u lost them. its doesnt matter that it was a materialistic thing or it was living person. but somewhere u lost something. now a days i m also a full of with sorrows, that i lost the thing i most love. those who know me they think that it is love affair, but let me tell u this is not lke that. i think the true love is not only one sided it is affection from both sides. really . hve u saw that hindi movie - god tussi great ho!
in that movie god himself give his power to a man for 10 days and said him to look after to the whole mankind. but that man spend 9 days with his beloved. on 9th day god comes to him and worried about the world. ''dont worry god'' that man replied. after that that man who became the god give everyone to everything what they wants. immidieately after that the whole world changes. the theif comes out of the prison, anarchy in the parliament. whole world full of with only sorrows. that time god come to that man anad ask '' what r u doing? u r using my power for fulfilling everyones dream.and see what is gong on.''
man realise his mistake. again god come in the power and control the whole earhth. the story is very simple, but u know the fact is god always gives u the things u dont want, and the tragedy is u satisfiy with it. so friends dont take as it is. fight against ur fate. fight against the system, but it will give u what? i think satisfaction? what about you?
when victory is confirm then even coword can fight but the real hero is who fights when defeat is certain..
koi lade ya na lade main to ladunga..