Wednesday, January 6, 2010

सुशेगाद !

अरोरा टोवेर्स ते सांतान इज (पणजिम) हा प्रवास तसा फार कंटाळवाणा नाही. सकाळी अमृततुल्यची सवय असल्याने सकाळी सकाळी बारच सुरु असतात; हेच तेवढे वेगळेपण. इथे रमलोय. भरीस भर म्हणजे आता महाराष्ट्रातून फोन आला कि काय 'गोवेकर कसे आहात?', असे विचारले कि बरे असा.'.तुम्ही खोयेन असा? असे उलट विचारले कि मग समोरचा गप्प होतो.
पिण्याचा पाण्यालासुधा इथे माशाचा वास येतो, त्यामुळे खाण्याबद्दल फार काही लिहित नाही.
गो मन तक - असे वर्णन एका मित्राने केले होते. तेच खरे आहे. परदेशी पर्यटक, 'मद्य'रात्री यापेक्षा गोवा खूपच वेगळा आहे. पोर्तुगीजांच्या पारतंत्राच्या खुणा जपत, भारतीय अस्मितेची लक्तरे अरबी समुद्राचा वेशीवर लटकलेली मला दिसलीत. त्यात मी 'भायला' ! कुठेही गेलो कि मीच आता मी 'घाटी' असल्याचा परिचय देतो; त्यामुळे पुढे प्रोब्लेम येत नाही. इथल्या भाषेवर, खाण्यावर, 'पिण्या'वर, संस्कृतीवर पोर्तुगिजांचा प्रभाव खूप आहे. एकाचवेळी कोंकणी, पोर्तुगीज शिकता येईल याचा आनंद आहेच. नवे मित्र मैत्रिणी भेटलेत.
वातावरणाशी जुळवून घेत, विरोधकांना टपली मारत हळू हळू काम शिकतोय. भात- तळलेला बांगडा, कढी, आमसुलाचे सार, पापड, लोणचे असे जेवण असल्याने पोटाची चिंता नाही.
इथे सकाळी दिवस लवकर सुरु होतो. साडेतीन वाजता इथे संध्याकाळ होते आणि आठ वाजता मध्यरात्र. बार तेवढे सुरु असतात. सकाळी उठून कोणती दारू घ्यायची आणि कोणता मासा खायचा; याच विचाराने दिवस सुरु होतो. (सध्या तरी माझा नाही.)
समुद्र मात्र धुंद करणारा. अफाट. आपली औकाद पहायची असेल न तर, समुद्रावर या. इथे कळते आपण किती शुद्र आहोत ते.!
मध्ये एकदा बा. भ. बोरकर यांचा गावी जाऊन आलो. मोठा माणूस होता. त्यांचा काळापासून सुरु असलेला कोंकणी मराठी वाद अजूनही सुरु आहे. परकीय आपल्यात भांडणे लावून जातात आणि आपण मुर्खासारखे भांडतो, याला गोवासुद्धा अपवाद नाही. तरीही ' आहे तसा स्वीकारा आणि पाहिजे तसा घडवा' हे सूत्र माझा मनाशी पक्के आहे. वातावरण, खाण्याला सरावलो आहे. माणसांचीही सवय होईल.
गोव्यात रुळण्यासाठी मला मदत करणारे गणाधीश प्रभुदेसाई (पुणे, लोकसत्ता) व जोयना (डीएनए, मुंबई) यांचे आभार!
सध्या तरी आयुष्य 'सुशेगाद'!!!!!!!!!!!

14 comments:

Snehal Bansode. said...

छान लिहिलंयस.गोव्याबद्दल लिही- हे मी सांगितलेलं लक्षात ठेवलंयेस हे बघून बरं वाटलं . आणि तिथंही आमसुलाचं सार आहे तर ! ऐष कर बाबा ! गोवा , समुद्र , मासे ...मस्त मजा कर .

jivan said...

kay tekchand visaralas vatat goa kas vatala yathikana vishai adhik lihit ja. ajacha vishay changala hota

अवधूत डोंगरे said...

शुभेच्छा.

Unknown said...

hey...
You have written so nice...
one can actually imagine the goa at the time of reading...

Unknown said...

hey...
You have written so nice...
one can actually imagine the goa at the time of reading...

johaar-maibaap said...

Thanks Punam !

Unknown said...

Hey its really nice i liked it...tumhi vaaparleli bhasha dekhil phaar chaan aahe...

johaar-maibaap said...

Thaks Vrushali,
actually the image about GOA which i have heard it is totally changed after being with LOKMAT. i wanted to tell the people the real GOA which is in the village.

Sheetal Bhangre said...

सुंदर लिहिलं आहेस.
'पिण्याच्या पाण्याला सुद्धा इथे माशाचा वास येतो' ...सही कमेन्ट..

sugandha said...

छान लिहिलं आहेस हो. खाण्या-'पिण्यास'-मुक्त हिंडण्यास शुभेच्छा.

Sushrut said...

टेकचंद,

अगदी आटोपशीर आणि भाताबरोबर माशाच्या कालवणासारखे चविष्ट लिहिले आहेस..पण समुद्र मात्र धुंद नाही, तर बेधुंद..आणि बारमधून बाहेर येणार्‍यांना आणखीनच मद्यधुंद करून टाकतो(आणखी एक घशाखाली). उत्तमच लिखाण..शब्दांची ही खाण आणखी वाढवावी, वाढावी, हीच शुभेच्छा.

सुश्रुत

श्रीराम said...
This comment has been removed by the author.
श्रीराम said...

प्रिय मित्रा,
ब्लॉग वाचला. या निमित्ताने तुझे उद्योग समजले. म्हणजे काम कसे सुरु आहे, आणि तू मजेत आहेस ते समजले. कीप इट अप. लिहित जा आम्ही वाचत जाऊ.

renuka said...

Mast...!!! :-) Pan Sushegad means???