माझ्या हातरुमालाइतके (कदाचित कमीच) कपडे अंगावर असलेल्या अनेक पर्यटक गोव्याचा कलंगुट, अंजुना, सिकेरी, वाघातूर बीचवर भारतीय संस्कृती पाहायला येतात; आणि भारतीय पर्यटक त्यांना. हे गोव्याचे पर्यटन! तुम्हाला गोवा अनुभवायचा असेल तर ग्रामीण भागात जा. ग्रामीण भागात गेल्यावर मी 'माझ्या गोव्याच्या भूमी' तला गोवा अनुभवला.
लाल मातीतले वळणाचे रस्ते. पहाटेचे धुके. नारळी- पोफळीचा बागा. आणि सांस्कृतिक वातावरण. आणि
तियात्र. तियात्र हा इथला आवडता कलाप्रकार. तीयात्रात कितीही संख्या असू शकते. लाइव म्युझिक हे तीयात्राची खासियत. माशासारखे सुंदर डोळे (इथल्या मुलींचे हे वैशिष्ट्य) असलेल्या नटया . त्यांचा समवेत पुरुषांचा कसदार अभिनय . तियात्र म्हणजे साडेतीन तासांचे ज्वलंत विषयावर भाष्य करणारे रोमन नाटक. अफलातून प्रकार आहे. तियात्र म्हणजे पोर्तुगीज भाषेत नाटक.
तीयात्रातील कांताराच्या ( कोंकणीत गीत) काही ओळी -
हि आयाजकालची भुरगी केन्ना शिकपाना, फकत चेडवा बराबर रावून करता पिशेपणा, फ्रेंड- फ्रेंड म्हणोन सगळ्यांच्या घालतात काना...... आनी मोगचो फोग जाऊन पडतात फोणा.
(माझे सहकारी शेखर नाईक हे स्वतः उत्तम कलाकार आहेत. त्यांचा कडून ऐकलेल्या या काही ओळी. एका दमात या ओळी म्हणायच्या हे विशेष. शेखरविषयी नंतर कधीतरी.)
3 comments:
एकदम ' गोवन ' झाला रे भाऊ तू ! गोव्यातलं नेहमीच्या 'प्रेक्षणीय' स्थळांपेक्षा वेगळी छान माहिती देतोयेस . फक्त 'त्यांच्या समवेत पुरुषांचा कसदार अनुभव' म्हणजे काय ? तुला ' अभिनय ' म्हणायचंय का ?
धन्यवाद स्नेहल. पुढच्या वेळेस अशा चुका टाळण्याचा प्रयत्न करीन.
Really good one... Something different which never heard... I like different things.. Can u give me more info? Its too short...
Post a Comment